

GEETANJALI KULKARNI PARN PETHE
ESAKAL
सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांनी मुलं नको असा निर्णय घेतलाय. आपण मुलं जन्माला घालायची नाही असं त्यांनी ठरवलेलं असतं. कुणाला आपण त्यांचं पालन पोषण व्यवस्थित करू शकणार नाही, त्यांना वेळ देऊ शकणार नाही याची भीती असते तर काहींना समाजात जे काही सुरू आहे त्यामुळे मुलांना योग्य वातावरण देऊ शकणार नाही अशी भीती आहे. यात अभिनेता अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांचा समावेश होतो. त्यांची जोडी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे, तर दुसरीकडे पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे यांची जोडीदेखील तरुण प्रेक्षकांमधील लोकप्रिय जोडी आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या दोघीनींही कुटुंबाबद्दल आपापलं मत मांडलंय.