

AKSHAY ATHARE
ESAKAL
गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा प्रभाव वाढलाय. सोशल मीडियावर अनेक नवे इन्फ्लुएन्सर आलेत. करोना नंतर तर अनेकांनी आपला मोर्चा इंस्टाग्रामकडे वळवला आणि त्याला कमाईचं साधन बनवलं. आपले हटके व्हिडिओ बनवून त्यातून प्रसिद्धी मिळवली. त्यांचे लाखो फॉलोवर्स असतात आणि त्यातूनच बिझनेसदेखील होतो. असाच एक इन्फ्लुएन्सर ज्याने सोशल मीडियावरील कंटेन्टने ओळख मिळवली आणि आज त्याने हक्काचं घर घेतलंय. हा इन्फ्लुएन्सर आहे अक्षय आठरे. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पत्र्याच्या घरातून आता त्याने हक्काच्या घरात गृहप्रवेश केलाय. त्याच्या आयुष्यातील हा खास क्षण त्याने चाहत्यांसोबत शेअर केलाय.