
स्टार प्रवाह वाहिनी ही गेले २ वर्ष महाराष्ट्राची नंबर १ वाहिनी आहे. नवनवीन विषय आणि कसलेले कलाकार यामुळे या वाहिनीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. स्टार प्रवाह नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करते. नुकताच स्टार प्रवाहचा पुरस्कार सोहळा पार पडला. त्यात वाहिनीवरील दोन नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता स्टार प्रवाहावरील कोणत्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगलीये. त्यातील एका मालिकेचं नाव आता समोर आलंय.