

poorva shinde comeback on small screen
esakal
गेल्या महिन्याभरात छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमध्ये काही अभिनेत्रींची एंट्री झालीये. कुणाची खलनायिका म्हणून तर कुणाची मित्र म्हणून आता छोट्या पडद्यावरील अशीच एक गाजलेली खलनायिका परत आली आलीये. 'सन मराठी' वरील 'इन्स्पेक्टर मंजू' मालिका नवनवीन ट्विस्टसह रंजक वळणार आली आहे. मालिकेत आर्यनची एन्ट्री झाल्यापासून त्याने सत्या आणि मंजूमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी मोठा डाव आखला. मंजूसोबत लग्न करण्याचाही त्याचा प्लॅन होता. मात्र मंजूने त्याचा हा प्लॅन उधळून लावत आर्यनची बिनलग्नाची वरात काढली. त्याला धडा शिकवण्यासाठी मंजूने दुर्गेचं रूप धारण केलं.आता मालिकेत आणखी एक मोठं वळण आलं आहे.