

NAVI JANMEN MI
ESAKAL
छोट्या पडद्यावर सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. गेल्या काही महिन्यात अनेक मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर काहींनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र आता सन मराठी वाहिनीने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय. गेली दोन वर्ष सन मराठीवर चांगली सुरू असलेली लोकप्रिय मालिका 'फिरुनी नवी जन्मेन मी' अचानक बंद करण्यात आलीये. ही मालिका प्रेक्षकांची अत्यंत लाडकी होती. या मालिकेत मणिराज पवार, शिल्पा ठाकरे आणि रोहन गुजर यांच्या मुख्य भूमिका होत्या. फार कमी वेळात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं. आता अचानक ही मालिका बंद करण्यात आलीये त्यामुळे प्रेक्षकही नाराज आहेत.