

prabhakar more
ESAKAL
'शालू झोका दे गं मैना' असं म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर मोरे यांनी आपल्या अनोख्या शैलीने सगळ्यांना वेड लावलंय. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून ते सगळ्यांना पोट धरून हसवतात. आपल्या मालवणी भाषेच्या गोडव्याने त्यांना घराघरात लोकप्रियता मिळाली. मात्र त्यांचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. दिवसा काम करून ते रात्री नाटकांच्या रिहर्सलला जायचे. तर पत्नी घरी टिकल्यांचं काम करायची. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रभाकर मोरे यांच्या पत्नीने त्यांचा संघर्षाचा काळ सांगितला आहे.