

Entertainment News : प्रभास आपल्या दमदार चित्रपटांच्या लाइनअपने पॅन-इंडियन सुपरस्टारडमला सतत नव्या उंचीवर नेत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, हा त्यांच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा टप्पा मानला जात आहे. आपल्या प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स आणि सिनेमाप्रती असलेल्या समर्पणासाठी ओळखले जाणारे प्रभास सध्या सतत ‘फौजी’ आणि ‘स्पिरिट’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत, तसेच आणखी एका मोठ्या प्रोजेक्टची तयारीही करत आहेत.