prabhu shelke
esakal
Premier
ऊसतोड करून औषधाला पैसे जमवायचे... प्रभू शेळकेने सांगितला त्याचा असाध्य आजार; म्हणाला, 'लोक बाबांना हिणवतात...'
BIGG BOSS MARATHI 6 PRABHU SHELKE DESEASE: 'बिग बॉस मराठी ६' मध्ये सहभागी झालेला खेळाडू प्रभू शेळके याने एका मुलाखतीत त्याच्या कठीण काळाबद्दल आणि आजाराबद्दल सांगितलं आहे.
'बिग बॉस मराठी ६' सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. यावेळेस इन्फ्लुएन्सर, नृत्यांगना, राजकारणी देखील या सीझनमध्ये पाहायला मिळतायत. त्याच्यातच आलाय काळू डॉन म्हणजेच प्रभू शेळके. प्रभू एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. त्याचं फॅन फॉलोविंगदेखील मोठं आहे. मात्र प्रभूला एक गंभीर आजार आहे. घरात येण्यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत या आजारपणाबद्दल त्याने सांगितलेलं. आई-वडिलांना हिणवलं जाणं, त्यांच्या औषधांचा खर्च याबद्दल तो मोकळेपणाने बोललाय.

