PRAHAR: THE UNTOLD STORY OF UJJWAL NIKAM
esakal
UJJWAL NIKAM PRAISES RAJKUMMAR RAO’S PERFORMANCE IN PRAHAR: न्यायालयात रंगणारा युक्तिवाद, महत्त्वाच्या खटल्यांमधील अनपेक्षित घडामोडी आणि न्याय मिळविण्यासाठी करावा लागणारा संघर्ष यांचा अनुभव आता ‘प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटनांसोबतच न्यायालयात नेमके काय घडले, याचीही झलक पाहायला मिळणार आहे. अभिनेता राजकुमार राव उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारत असून, अभिनेता ललित प्रभाकर अजमल कसाबच्या भूमिकेत दिसणार आहे. अविनाश अरुण यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.