
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे लग्न. तिने 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेत ती महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसली होती. तिचा अभिनय आणि त्या भूमिकेप्रतीचं प्रेम पाहून प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतलं होतं. आता प्राजक्ता खऱ्या आयुष्यात लग्न करतेय. त्यात योगायोग म्हणजे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव देखील शंभूराज आहे. एका अपघातामुळे ते जवळ आले. मात्र आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी केलेल्या त्यागाबद्दल सांगितलं आहे.