लग्नानंतर प्राजक्ताचा पहिला सिनेमा; साकारणार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची भूमिका, चित्रपटाचं नाव वाचलंत का?

PRAJAKTA GAIKWAD FIRST FILM AFTER MARRIAGE: लग्नानंतर मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती नव्या सिनेमात सावित्रीबाईंची भूमिका साकारत आहे.
prajakta gaikwad

prajakta gaikwad

ESAKAL

Updated on

ऐतिहासिक वैभवाने नटलेल्या महाराष्ट्रातील वाड्यांमध्ये ‘भिडेवाडा’ हे नाव विशेष मानाने घेतले जाते. कारण ही वास्तू केवळ दगड–मातीची रचना नसून, ती आहे एका क्रांतीची साक्ष. महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी येथेच देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. त्यामुळे ‘भिडेवाडा’ ही केवळ वास्तू न राहता, स्त्री शिक्षणाच्या ऐतिहासिक संघर्षाची आणि परिवर्तनाची साक्षीदार ठरली आहे. हाच ऐतिहासिक ‘भिडेवाडा’ आता मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या वास्तूच्या प्रेरणादायी वारशातून जन्मलेली एका तरुणीच्या जिद्दीचा, स्वप्नांचा आणि संघर्षाचा प्रवास ‘भिडेवाडा’ या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे. भूतकाळाच्या प्रेरणेतून वर्तमानाशी नाळ जोडणारी ही कथा समाजमनाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com