
prajakta gaikwad WEDDING DATE
ESAKAL
'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. प्राजक्ता याच मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाली. प्रेक्षक तिच्याशिवाय इतर कुणालाही येसूबाईच्या भूमिकेत पाहायला तयार नाहीत. तिने येसूबाई हे पात्र प्रेक्षकांच्या मनात कायमच ठसवलं. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताचा साखरपुडा पार पडला होता. आता ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिने नुकताच तिच्या लग्नपत्रिकेचा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. जो पाहून चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. यात तिच्या लग्नाची तारीखही दिसतेय.