

PRAJAKTA GAIKWAD
ESAKAL
छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिने 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका चांगलीच गाजली. तिच्या सालस आणि सुंदर चेहऱ्यावर चाहते फिदा झाले. मात्र तितकीच कणखर नि खंबीर येसूबाई प्राजक्ताने पडद्यावर साकारली. आजही चाहते तिला येसूबाईंच्या नावानेच ओळखतात. आता प्राजक्ता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे चाहते तिच्या लग्नाबद्दल उत्सुक आहेत. आता पहिल्यांदाच ती तिच्या सासरच्या लोकांबद्दल बोलली आहे.