
prajakta gaikwad
esakal
'येसूबाई' बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. तिने 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका केली. ज्यातून ती घराघरात पोहोचली. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. गेले काही महिने ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती लवकरच शंभूराज खुटवड याच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे ती चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. नुकताच तिने तिच्या लग्नपत्रिकेचा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला होता. आज तिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्यात.