

prajkata gaikwad
esakal
'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. प्राजक्ताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही प्रेक्षक तिला येसूबाई म्हणून ओळखतात. आपल्या अभिनयाने तिने येसूबाईंची भूमिका अजरामर केली. त्यामुळे प्रेक्षकांचं तिच्यावर विशेष प्रेम आहे. त्यात प्राजक्ता लग्नबंधनात अडकणार असल्याने आता चाहते तिच्या लग्नाचा थाट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता तिच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालीये. आज प्राजक्ताचा घाणा आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडलाय. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.