Prajakta Mali planting rice in a field on her birthday Viral Video
Esakal
MARATHI ACTRESS PRAJAKTA MALI VIRAL FARMING VIDEO: अभिनेत्री प्राजक्ता माळीने यंदाचा वाढदिवस हटके पद्धतीने साजरा केला आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेत. यातील एका व्हिडीओने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता कोणत्याही पार्टी किंवा ग्लॅमरस सेलिब्रेशनऐवजी थेट भातशेतीत उतरून श्रमदान करताना दिसत आहे. तिच्या या अनोख्या वाढदिवस सेलिब्रेशनची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.