
Marathi Entertainment News : काल 25 फेब्रुवारीपासून अभिनेत्री प्राजक्ता माळी चर्चेत आली आहे ते तिच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पार पडणाऱ्या तिच्या नृत्याच्या कार्यक्रमामुळे. महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात भरतनाट्यम नृत्यप्रकारातील शिवार्पणमस्तु सादर करण्यासाठी प्राजक्ताला आमंत्रित आज 26 फेब्रुवारीला आमंत्रित करण्यात आलं होतं. पण तिच्या कार्यक्रमाला मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला होता. त्यातच आज प्राजक्ताने या कार्यक्रमाबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.