
महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिराच्या प्रांगणात मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगणा प्राजक्ता माळी हिच्या 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. मात्र, त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारा प्राजक्ता माळी यांचा कार्यक्रम अडचणीत येण्याची शक्यताआहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमांवर पुरातत्व विभागाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. देवस्थानला पुरातत्व विभागाकडून पत्र देण्यात आले आहे. कार्यक्रमापूर्वी दिल्लीच्या कार्यालयातून परवानगी घेण्याचे आदेश पुरातत्व विभागानं दिले आहेत. तसेच माजी विश्वस्तांनी देखील कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे.