

prajakta mali
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिका ते मोठा पडदा असा प्रवास करून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्मण करणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. ती मराठी सिनेसृष्टीमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताच्या अभिनयाची तर चर्चा होतच असते मात्र आता तिने कोकणातला खास पदार्थ बनवून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय. अभिनेत्रींना जेवण बनवता येत नाही हा समज तिने मोडीत काढलाय. तिने हा पदार्थ बनवतानाचा एक व्हिडिओ देखील शेअर केलाय.