

PRAJAKTA MALI NEW HAIRCUT
ESAKAL
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला वेगळ्या ओळखीची गरज नाही. तिने कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. 'जुळून येती रेशीमगाठी' मधून प्राजक्ताला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तेव्हापासून तिने मुळीच मागे वळून पाहिलं नाही. अनेक प्रोजेक्ट, चित्रपट, मालिका आणि वेबसीरिज मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. ती नेहमीच तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच आता प्राजक्ताने तिचे काही फोटो शेअर केलेत जे पाहून प्रेक्षक चाट पडलेत. प्राजक्ताने चक्क तिचे केस कापलेत. हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. या पोस्टमध्ये तिने केस का कापले याचं कारणही सांगितलंय.