
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. उत्कृष्ट अभिनयसोबतच उत्तम नृत्यकला अवगत असलेली प्राजक्ता मराठी प्रेक्षकांची आवडती आहे. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. तिचा 'फुलवंती' हा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मात्र याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने केलेलं एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.