
PRAJAKTA MALI
ESAKAL
'फुलवंती' मधून प्रेक्षकांच्या काळजात घर करणारी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत नाव कमावलंय. अभिनयासोबतच ती अनेक व्यवसायदेखील करते. तिचा स्वतःचा डान्स क्लास आहे. तिचा ज्वेलरी ब्रँडदेखील आहे. सोबतच तिचं फार्महाउसदेखील आहे. हे सगळं सांभाळून ती शूटिंगदेखील करताना दिसते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यामुळेच ती चाहत्यांसोबत जोडलेली राहते. मात्र आता प्राजक्ता एक वेगळ्याच कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. तिने दिलेली एक मुलाखत सध्या चांगलीच गाजतेय. यात तिने सोशल मीडियाचा गैरवापर कसा केला जातो याबद्दल सांगितलं आहे.