

prajakta mali
esakal
छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रेक्षकांची लाडकी आहे. प्राजक्ताने आपल्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. गेली कित्येक वर्ष प्राजक्ता मराठी इंडस्ट्रीवर राज्य करतेय. ती एका ज्वेलरी ब्रॅण्डची मालकीण आहे. सोबतच तिचं फार्महाऊस देखील आहे. ती चित्रपटांमध्ये,ही दिसते. मात्र चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहतायात. ती लग्न कधी करणार असा प्रश्न अनेकदा तिला विचारण्यात येतो. आता प्राजक्ताने तिला कसा मुलगा हवाय याबद्दल सांगितलं आहे. तिच्या केवळ २ अपेक्षा आहेत.