

PRAJAKTA MALI
esakal
छोटा पडदा ते मोठा पडदा असा प्रवास करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर यशाचं शिखर गाठलं. ती एक यशस्वी अभिनेत्री असण्यासोबतच एक यशस्वी बिझनेसवूमनदेखील आहे. तिचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड आहे. सोबतच तिचं फार्महाउस देखील आहे. ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येते. मात्र ती जर अभिनेत्री नसती तर तिने काय केलं असतं हे तिने एका मुलाखतीत सांगितलंय.