PRAJAKTA MALI SELLS GOREGAON EAST FLAT
Esakal
PRAJAKTA MALI REAL ESTATE INVESTMENT AND PROPERTY DEAL: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. तिची जुळून येती रेशीमगाठी ही मालिका तर प्रचंड गाजली. दरम्यान आता प्राजक्ता तिच्या रिअल इस्टेट गुंतवणुकीमुळे चर्चेत आलीय. माहितीनुसार प्राजक्ताने तिचा गोरेगाव ईस्टमधील फ्लॅट विकला आहे. तसंच १.१२ कोटी रुपयांना या फ्लॅटची डील झाल्याची माहिती आहे. त्यामुळे तिची सोशल मीडियावर चर्चा रंगताना पहायला मिळतेय.