

PRAJAKTA MALI
ESAKAL
छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिच्या सौंदर्याची चाहत्यांवर मोहिनी आहे. ती उत्कृष्ट नृत्यांगनादेखील आहे. प्राजक्ता नेहमीच आपल्या फिटनेसबाबत सजग दिसून येते. वेळेत व्यायाम आणि योग करून अतिशय फिट असण्याकडे तिचा कल आहे. मात्र दिवसभर शूटिंग आणि इतर कामं असतानाही प्राजक्ता स्वतःची काळजी कशी घेते असा प्रश्न अनेकांना पडतो. आता प्राजक्ताने तिच्या फिटनेसच्या मागचं एक सुपरफूड सांगितलं आहे. तिने एका ज्यूसची रेसिपी चाहत्यांना सांगितलीये जो ती सकाळी उपाशीपोटी पिते.