प्राजक्ता माळी, स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे याचा 'चिकी चिकी बुबूम बूम' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधी या चित्रपटातील गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटातील 'बूम बूम बूम' हे गाण्यावर अनेक रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान प्राजक्ता माळी आणि मृण्मयी देशपांडे हिने सुद्धा या गाण्यावर ठेका धरला आहे.