

prapti redkar zee marathi
esakal
नवरात्र म्हणजे स्त्रीच्या सामर्थ्याचा उत्सव आणि तिच्यातील दुर्गाशक्तीला वंदन करण्याचा काळ! देवीच्या विविध रूपांची पूजा करताना तिच्यातील धैर्य, आत्मविश्वास आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकदही आपल्याला प्रेरणा देते. मात्र, स्त्रीशक्ती ही केवळ देवीच्या पूजेपुरती मर्यादित नसून प्रत्येक स्त्रीच्या विचारांत, निर्णयांत आणि स्वतःसाठी खंबीरपणे उभं राहण्याच्या वृत्तीतही दिसून येते. आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणं, चुकीच्या गोष्टींना विरोध करणं आणि स्वाभिमानाने जगणं, हीच खरी स्त्रीशक्ती आहे. झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत ‘सावली’ ची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिचाही स्त्रीशक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असाच आहे. नवरात्रीच्या निमित्ताने तिने स्वसंरक्षणाचं महत्त्व आणि स्वतःच्या आयुष्याची नायिका होण्याचा दिलेला संदेश खास आहे.