मन आजही तुमची वाट पाहतंय; वडिलांच्या वर्षश्राद्धादिवशी प्रार्थना बेहेरे भावुक; कावळ्याने घास घेतल्याचा व्हिडीओ केला शेअर

Prarthana Behere Father First Death Anniversary: अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या वडिलांचं वर्षभरापूर्वी निधन झालेलं. त्यानंतर अभिनेत्री एकटी पडली होती. आता तिने वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी भावुक पोस्ट शेअर केलीये.
prarthana behere father death

prarthana behere father death

esakal

Updated on: 

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने तिच्या करिअरमध्ये प्रचंड लोकप्रियता अनुभवली. मात्र २०२५ मध्ये तिच्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे ती कोलमडून गेली. तिने तिच्या वडिलांना गमावलं. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रार्थनाच्या वडिलांचं निधन झालं. मात्र आजही ती आपल्या वडिलांच्या आठवणींमधून बाहेर पडू शकलेली नाही. आजही ती तिच्या वडिलांची वाट पाहत आहे. नुकतीच प्रार्थनाने एक पोस्ट करत तिच्या भावना व्यक्त केल्यात. वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी तिने त्यांचे काही फोटो शेअर केलेत.

Loading content, please wait...