प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिचा 'सखे ग साजणी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं असून सध्या सोशल मीडियावर याच चित्रपटाची चर्चा होताना पहायला मिळतेय. काही दिवसांपूर्वी प्रार्थना बेहेरेने या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 'रेडबल्ब प्रॉडक्शन हाऊसचा' हा नवा चित्रपट असल्याचं तिने सांगितलं होतं. दरम्यान आता या चित्रपटाचं पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.