

Prarthana Behere
sakal
महिलांचे आयुष्य घरापुरतेच मर्यादित मानले जाते. लहानपणी त्या आई-वडिलांचा विचार करतात, लग्नानंतर नवऱ्याचा व कुटुंबाचा विचार करतात आणि मुलं झाल्यावर त्यांचाच विचार करण्यात आयुष्य जाते. पण स्वतःला काय हवे आहे? या प्रश्नाचा विचार मात्र त्या क्वचितच करतात. त्यामुळे स्वतःच्या आनंदासाठी मुक्त भटकंती ही त्यांच्या यादीत सहसा नसते.