

prasad jawade
esakal
'पारू' मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता प्रसाद जवादे याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. प्रसाद आणि अमृता यांची जोडीही चाहत्यांची आवडती आहे. ते कायम त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्यांनी अनेक नाटक आणि मालिकांमध्ये एकत्र काम केलंय. प्रसाद आणि अमृता 'बिग बॉस मराठी'च्या घरात भेटले. मात्र तेव्हा प्रेमात असूनही प्रसादने पुढाकार घेतला नव्हता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रसाद आणि अमृताने त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे.