
prasad oak
esakal
मराठी चित्रपटसृष्टीत आजच्या काळात शंभर चित्रपट करणं ही खरंच एक मोठी आणि कठीण गोष्ट आहे. परंतु, ही गोष्ट साध्य करून, प्रत्येक भूमिकेला न्याय देत, सातत्याने विविध कलाकृती सादर करून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे प्रसाद ओक! 'अष्टरूपा वैभवी लक्ष्मी माता' ते आजचा 'वडापाव' हा प्रवास प्रसाद ओकने मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने पूर्ण केला आहे. 'कुंकू लावते माहेरचं' हा चित्रपट त्याचा पहिला चित्रपट होता. हा प्रवास खडतर असूनही, त्याने यशस्वीरित्या एक मोठा टप्पा गाठला आहे. 'वडापाव' हा अभिनेता म्हणून प्रसादचा शंभरावा चित्रपट आहे.