

PRASAD OAK SON ENGAGEMENT
ESAKAL
मराठी सिनेविश्वात पुन्हा एकदा लगीन घाई सुरू झालीये. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. प्रेक्षकही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अशातच आता कलाकार नाही तर कलाकारांची मुलंदेखील बोहोल्यावर चढत आहेत. लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता प्रसाद ओक आणि मंजिरी यांचा मोठा मुलगा लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. प्रसाद आणि मंजिरी लवकरच सासू सासरे होणार आलेत. त्यांच्या मोठ्या मुलाचा नुकताच साखरपुडा पार पडलाय. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने या सोहळ्याचे फोटो शेअर केलेत. जे पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय.