Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडी प्रसाद ओक आणि मंजिरी ओक सोशल मीडियावर सुद्धा तितकीच सक्रिय आहे. त्यांचे रील्स सोशल मीडियावर सगळ्यांचं मन जिंकतात. नुकतंच मंजिरीने तिच्या आयुष्यात घडलेला धक्कादायक प्रसंग शेअर केला. .रिक्षातून प्रवास करताना मंजिरीला धक्कादायक अनुभव आला. सोशल मीडियावर घडलेल्या घटनेचा व्हिडीओ शेअर करत तिने तिचा संताप व्यक्त केला. रिक्षा चालवताना रिक्षा चालक सतत मोबाईलवर रील्स बघत असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. मंजिरीने सांगूनही त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करत रील्स बघत रिक्षा चालवणं सुरु ठेवलं. हा प्रकार बघून अनेकांना धक्का बसला आहे. .या प्रकाराबाबत पोस्ट करत मंजिरी म्हणाली कि,"पैसे देऊन आणि वर आपला जीव मुठीत घेऊन , असा प्रवास का करायचा ?आणि ह्यावर ह्यांना काही बोलायच नाही . कारण ह्यांचीच अरेरावी ऐकून घेयला लागेल .दोनदा सांगूनही काही सुधारणा न झाल्यामुळे मी रिक्षा बदलली .आणि तरी ही त्याला काही फरक पडला नाही. म्हणजे भाडं गेलं तरी चालेल समोरच्याचा आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालीन पण मी रिक्षा चालवताना असा फ़ोन बघणारच. पूर्ण वेळ हा असाच रिक्षा चालवतो असं अत्यंत अभिमानानी सांगितलं त्यांनी मला…एकूणच कठीण आहे सगळंदेव त्याला अक्कल देवो.".यावर अनेकांनी कमेंट्स करत मंजिरीची साथ दिली. एकाने कमेंट केली कि," हा प्रकार वाढलाय आणि यांची अरेरावी पण" तर एकाने कमेंट केली आहे कि,"ठाण्यात जास्त झालंय आजकाल....ठाणे स्टेशन पासून जाणाऱ्या सर्व रिक्षा चालक सर्रास मोबाईल वापरतात" तर अनेकांनी रिक्षा चालकांची मुजोरी वाढली असून ते अत्यंत घमेंडखोर असल्याचं म्हटलं आहे..या आधीही अभिनेत्री रेश्मा शिंदेने असाच व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला होता. प्रशासन यावर काही कारवाई करणार का असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. .कामाठीपुरातील आयुष्य आणि आठवड्यातून तीनदा उपासमारीची वेळ ; बॉलीवूडला खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्याचं हृदयद्रावक आयुष्य .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.