
prasad oak
esakal
आधी छोटा पडदा आणि आता मोठा पडदा गाजवणारा लोकप्रिय मराठी अभिनेता प्रसाद ओक याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. ती एक उत्तम दिग्दर्शकदेखील आहे. अनेक उत्कृष्ट चित्रपटांचं दिग्दर्शन त्याने केलंय. मात्र त्याचा सुरुवातीचा काळ हा इतका सहज सुकर नव्हता. शूटिंगच्या निमित्ताने कलाकारांना अनेकदा आपल्या कुटुंबापासून दूर राहावं लागतं. बऱ्याच गोष्टी या आपल्या कुटुंबासोबत साजऱ्या नाही करता येत. मात्र त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. अशाच एक धक्कादायक किस्सा प्रसादसोबतही घडला होता. ज्याची त्याने कल्पनादेखील केली नव्हती. त्याचा मुलगा त्याच्या जवळ यायला तयार नव्हता.