
Marathi Entertainment News : सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये नांदते मराठी,
कोकणातला गोडवा माझी ही मराठी...
विदर्भाची, दक्खनची शान ही मराठी,
दिल्लीचेही तख्त राखिते माय मराठी...
गाण्यातील या ओळींनी प्रत्येक मराठी माणसाला स्फूर्ती मिळत आहे. महाराष्ट्रातील आपली नाती-गोती, सणवार जपत आपल्या मराठी मायभूमीवर साऱ्या मराठी बांधवांना बांधून ठेवलं आहे. मराठी असल्याचा गर्व उराशी ठेवून आज प्रत्येक मराठी माणूस अगदी ताठ मानेने वावरत आहे.