
THARLA TAR MAG EPISODE UPDATE
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' गेली कित्येक आठवडे टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या पुन्हा एकदा या मालिकेत धडाकेबाज कथानक दाखवण्यात येणार असल्याचं दिसतंय. या मालिकेतील सायली अर्जुनची जोडी प्रेक्षकांची आवडती आहेच . मात्र सायलीचं प्रतिमासोबत दाखवण्यात आलेलं नातंदेखील प्रेक्षकांना भावतं. अशातच आता प्रतिमा सायलीसाठी प्रियाचं थोबाड फोडणार आहे. पाहूया आजच्या ३ ऑक्टोबरच्या भागात काय होणार आहे.