PRAVIN TARDE
esakal
HOW MARATHI FILMS CAN EXPAND BEYOND MUMBAI AND PUNE,: ‘मुंबई, पुणेपल्याड मराठी सिनेमा जायला हवा,’ असे उद्गार निर्माते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी काढले. मराठी चित्रपटांची बाजारपेठ मोठी असून, योग्य नियोजन आणि प्रभावी मार्केटिंगच्या माध्यमातून मराठी सिनेमा ५०० कोटींचा व्यवसाय करू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘चित्रपताका’ महोत्सवात आयोजित ‘आजचा मराठी सिनेमा’ या परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात तरडे यांच्यासोबत सिनेकर्मी अमृता राव, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि सुहृद गोडबोले सहभागी झाले होते. सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मराठी चित्रपटांची बाजारपेठ, बदलत्या प्रेक्षकांच्या आवडीनिवडी, चित्रपटांचे मार्केटिंग आणि मराठी चित्रपटांसमोरील व्यावसायिक आव्हाने यावर चर्चा झाली.