

PRAVIN TARDE PARENTS PRAISES SNEHAL TARDE
ESAKAL
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा 'देऊळबंद २' हा चित्रपट नुकताच थिएटरमधे प्रदर्शित झालाय. या चित्रपटाने प्रेक्षकांना थिएटरमधे खेचून आणलंय. यावेळेस नेमकं वेगळं काय असणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यामुळेच या चित्रपटाचे शो हाऊसफुल झालेत. २१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या 'देऊळबंद २' या चित्रपटात स्नेहल तरडे आणि मोहन जोशी मुख्य भूमिकेत आहेत. परिस्थितीने गाजलेल्या, वैतागलेल्या एका शेतकऱ्याच्या पत्नीची भूमिका स्नेहल यांनी केलीये जी थेट देवाशीच भांडायला जाते. तर मोहन जोशी यांनी स्वामी समर्थांची भूमिका केलीये. आता एका मुलाखतीत प्रवीण यांच्या आईवडिलांनी आपल्या सुनेचं कौतुक केलंय.