आधी बाबा गेले मग आईही... 'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्याने सांगितला कठीण काळ; म्हणाला, '१४ दिवसात सगळं संपलं...'

MARATHI ACTOR LOST PARENTS IN 14 DAYS: आपल्या डोळ्यादेखत आईवडिलांना गमावण्याचं दुःख काय असतं हे मराठी अभिनेत्याने त्या दिवसात अनुभवलं. १४ दिवसात त्याच्यासाठी सगळं संपलेलं.
Ayush Bhide

Ayush Bhide

ESakal

Updated on

आपल्या आयुष्यात कधी कोणता दिवस पाहावा लागेल सांगता येत नाही. त्यातही आपल्या आईवडीलांचा मृत्यू आपल्या डोळ्यांनी पाहणं हे खूप अवघड असतं. मात्र मराठी अभिनेत्याने फक्त १४ दिवसात त्याच्या आईवडिलांना गमावलं. 'आई कुठे काय करते', 'प्रेमाची गोष्ट' यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार अभिनेता आयुष भिडे याने त्याच्या आयुष्यात काही अशा प्रसंगांना तोंड दिलंय जे आपल्या आयुष्यात कधीही येऊ नयेत असं वाटतं. करोना काळात आयुषने त्याच्या आईवडिलांना गमावलं. नुकत्याच महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या कटू आठवणी सांगितल्यात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com