

Prime Video New Project Announcement
esakal
Entertainment News : भारतातील प्रेक्षकांसाठी सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या प्राइम व्हिडिओने आयोजित ‘प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स’ कार्यक्रमात आपल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ओरिजिनल सीरीज आणि चित्रपटांच्या स्लेटची घोषणा केली. या स्लेटमध्ये सुमारे ५५ नवीन मालिका आणि चित्रपटांचा समावेश आहे. यामध्ये भारतीय ओरिजिनल कंटेंटसह Amazon MGM Studios India च्या थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची तसेच अनेक मोठ्या लायसन्स्ड चित्रपटांची घोषणाही करण्यात आली. हे बहुभाषिक कंटेंट स्ट्रीमिंगपासून ते सिनेमागृहांपर्यंत प्रेक्षकांना व्यापक मनोरंजनाचा अनुभव देणार आहे.