
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या मराठी मालिकाविश्वातील आघाडीची मालिका आहे. या मालिकेतील ट्विस्ट अँड टर्न्स कायमच चर्चेत असतात. सध्या मालिकेत महत्त्वपूर्ण ट्विस्ट सुरु आहे. अर्जुन महीपत आणि साक्षीचं कारस्थान उघड करण्यासाठी पुरावे शोधतोय आणि त्याला पुरावे सापडू नयेत म्हणून महीपत प्रयत्न करतोय. त्यातच आता मालिकेत नवीन वळण येणार आहे.