
‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटातील नवं गाणं ‘पण या इगो चं’ नुकतंच प्रदर्शित झालं असून ते नात्यांतील प्रेम आणि अहंकारावर प्रकाश टाकतं.
गाण्याचे शब्द वैभव जोशी यांचे आहेत तर संगीत निनाद सोलापूरकर यांनी दिलं आहे.
या गाण्याची खासियत म्हणजे प्रिया बापट आणि भारती आचरेकर यांनी ते एकत्र गायलं असून, भारती आचरेकर यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी गाणं गायलं आहे.