

Asambhav Marathi Movie Review
esakal
Marathi New Movie Review : दिग्दर्शक सचित पाटीलच्या 'असंभव' या चित्रपटाच्या टीझरला आणि ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळालेली होती. गुढ आणि थरारक रहस्याने भरलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता लागलेली होती आणि आता अखेर हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झाला आहे. थरारक अनुभूती देणारा, धक्कादायक आणि मनामध्ये काहीशी भीती निर्माण करणारा तसेच रहस्याची उत्तम गुंफण असणारा असा हा चित्रपट आहे.