
‘ऋतूचक्र’ हे प्रेमगीत नुकतंच प्रदर्शित झालं असून ते दशावतार या आगामी चित्रपटातील आहे.
गाण्याचे गीतकार गुरु ठाकूर असून संगीत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी दिलं आहे. गायक म्हणून स्वानंदी सरदेसाई आणि साहिल कुलकर्णी यांनी आवाज दिला आहे.
हे गाणं प्रियदर्शिनी इंदलकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्या जोडीवर कोकणातील निसर्गरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आलं आहे.