Priyanka chopra: 2,800 तासांची मेहनत अन् 140 वर्षांचा इतिहास; देसी गर्ल प्रियांकानं परिधान केलेल्या खास नेकलेसची किंमत माहितीये?

Priyanka chopra Neckpiece: प्रियांकानं परिधान केलेल्या नेकलेसनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
2,800 तासांची मेहनत अन् 140 वर्षांचा इतिहास; देसी गर्ल प्रियांकानं परिधान केलेल्या खास नेकलेसची किंमत माहितीये?
Priyanka choprasakal

Priyanka chopra New Look: प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka chopra) बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांका ही भारतासोबतच परदेशातील विविध इव्हेंटमध्ये हजेरी लावत असते. नुकतीच प्रियांकानं बल्गारी फॅशन इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. या इव्हेंटसाठी प्रियांकानं केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. इव्हेंटमध्ये येताना प्रियांकानं परिधान केलेल्या नेकलेसनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. प्रियांकानं परिधान केलेले हे नेकलेस खूप खास आहे. जाणून घेऊयात तिच्या या नेकलेकबाबत...

बुल्गारीने नावाच्या ब्रँडने त्यांच्या दागिन्यांच्या कलेक्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तसेच या ब्रँडनं प्रियांकाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे फोटो शेअर करुन प्रियांकानं परिधान केलेल्या डायमंड नेकलेसची माहिती देण्यात आली आहे.

2,800 तासांची मेहनत

प्रियांकानं बुल्गारीचा लेटेस्ट सर्पेंटी एटर्ना डायमंड नेकलेस परिधान केला होता. बुल्गारीच्या 140 वर्षांच्या इतिहासाचे प्रतीक असणारा हा नेकलेस 140 कॅरेट हिऱ्यांनी जडलेला आहे. बुल्गारी ब्रँडच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, हा नेकलेस तयार करण्यासाठी 2,800 तास लागले होते.

नेकलेसची किंमत

वोगच्या रिपोर्टनुसार, प्रियांकानं परिधान केलेल्या नेकलेसची किंमत 358 कोटी रुपये आहे. प्रियांकाच्या या नेकलेसच्या डिझाईनला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

प्रियांकाचा खास लूक

बुल्गारी फॅशन इव्हेंटसाठी प्रियांका चोप्रानं खास लूक केला होता. प्रियांकानं काळ्या रंगाचा गाऊन, बल्गारी नेकलेस, डायमंडचे कानातले आणि ब्रेसलेट असा लूक केला होता.

प्रियांकाचा ‘टायगर' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटीवर रिलीज झाला होता. 'टायगर' या चित्रपटाला प्रियांकानं voice over दिले होते.

2,800 तासांची मेहनत अन् 140 वर्षांचा इतिहास; देसी गर्ल प्रियांकानं परिधान केलेल्या खास नेकलेसची किंमत माहितीये?
Nancy Tyagi: 30 दिवस, 1000 मीटर कापड अन् 20 किलो वजन; कान चित्रपट महोत्सवात परिधान केला स्वत: शिवलेला ड्रेस, नॅन्सी त्यागी आहे तरी कोण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com