
tharla tar mag update
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग चाहत्यांची अत्यंत आवडती आहे. यापूर्वी रविराज आणि प्रतापने सायलीचं कौतुक केल्याने प्रिया रागावते आणि रविराज आणि संपूर्ण घराला सुनावते. त्यानंतर ती सायलीला वाट्टेल ते बोलते आणि तिचे आईबद्दल काढते. हे पाहून प्रतिमा संतापते आणि तिला कानाखाली देते. आजच्या म्हणजे ५ ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये त्याच्या पुढे काय घडणार हे पाहण्यासारखं असणार आहे. मालिकेत आलेल्या या नव्या ट्विस्टवर प्रेक्षक खुश आहेत. आजच्या भागात प्रिया सायलीला सांगते की मी तुझ्यामुळे प्रतिमाला त्रास देते. तू जर का या घरात येणं बंद केलंस तर मी माझ्या आईशी चांगलं वागेन. हे ऐकून सायली किल्लेदाराच्या घरातून कायमचं निघून जायचं असं ठरवते.