
sindhutai mazi mai
esakal
बाहेरून झगमगाटी दिसणारी सिनेसृष्टी आतून मात्र अगदीच निराळी आहे. खोटं वागणं, खोटी आश्वासनं यावर उभी असलेली इंडस्ट्री अनेक निष्पाप लोकांना गळाला लावते. अनेक कलाकार इथे स्वप्न उराशी कवटाळून येतात. मात्र त्यांना एका वेगळ्याच सत्याला सामोरं जावं लागतं. दिवसरात्र मेहनत करूनही इथे कलाकारांचे पैसे दिले जात नाहीत. मालिका प्रदर्शित होऊन संपते तरी काम करणाऱ्यांना त्यांचे पैसे दिले जात नाहीत. यापूर्वी काम न मिळण्याच्या भीतीने कुणी बोलत नव्हतं. मात्र आता हळूहळू कलाकार याबद्दल बोलताना दिसतायत. 'सिंधुताई माझी माय' या मालिकेत काम केलेल्या कलाकारांनाही असाच काहीसा अनुभव आला आहे. लोकप्रिय अभिनेता शंतनू गांगणे याने घडल्या प्रकाराबद्दल सविस्तर सांगितलं आहे.