

Mukesh Bhatt Regrets Not Invited For Alia Bhatt Wedding
esakal
Entertainment News : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध भट बंधू - महेश भट आणि मुकेश भट यांनी एकत्र येऊन हिंदी चित्रपटसृष्टीला ‘आशिकी’, ‘सडक’, ‘राज’, ‘मर्डर’ यांसारखे अनेक गाजलेले चित्रपट दिले. त्यांच्या ‘विशेष फिल्म्स’ या बॅनरखाली निर्माण झालेल्या चित्रपटांनी एक काळ गाजवला होता. मात्र २०२१ मध्ये झालेल्या काही मतभेदांमुळे या दोघांमध्ये व्यावसायिक दुरावा निर्माण झाला आणि त्यानंतर त्यांनी वेगळ्या वाटा धरल्या.